(जैतापूर / राजन लाड)
राजापूर तालुका बौद्धजन संघ, राजापूर गट क्र ३ यांच्या वतीने संविधान दिन निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता श्रावस्ती नगर, पाचल, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयीची जागरूकता वाढविणे, तसेच भारतीय लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांविषयी तरुण पिढीमध्ये अभिमान व जाण निर्माण करणे हा आहे.
स्पर्धेचे गट :
गट क्र. १ : इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी
गट क्र. २ : महाविद्यालयीन गट
पारितोषिके :
गट क्र. १ (इयत्ता ८ वी ते १२ वी)
प्रथम क्रमांक – ₹३०००/- रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक – ₹२०००/- रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक – ₹१५००/- रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
गट क्र. २ (महाविद्यालयीन गट)
प्रथम क्रमांक – ₹४०००/- रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक – ₹३०००/- रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक – ₹२०००/- रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
नियमावली :
1. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश अर्ज निश्चित तारखेपूर्वी सादर करावा.
2. वक्तृत्व स्पर्धेचा विषय संविधानाशी संबंधित असावा (उदा. संविधानातील कलमे, हक्क, कर्तव्ये, प्रस्तावना इ.).
3. स्पर्धकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी स्पर्धा सुरू होण्याच्या १ तास आधी उपस्थित राहावे.
4. प्रत्येक स्पर्धकाला आपल्या विषयावर ७ ते १० मिनिटे बोलण्यासाठी वेळ दिला जाईल.
5. वक्तृत्व करताना शिस्त, सभ्य भाषा व योग्य आचरण आवश्यक आहे.
6. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
7. निकाल जाहीर झाल्यानंतर कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.
8. विजेत्यांना प्रमाणपत्र आणि बक्षिसे प्रदान करण्यात येतील.
सहभागासाठी अर्ज :
इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण नाव, जन्मतारीख, शाळा/महाविद्यालयाचे नाव, संपर्क क्रमांक, ई-मेल आणि वक्तृत्व गट नमूद करून राजापूर तालुका बौद्धजन संघ, राजापूर गट क्र. ३, मु.पो. पाचल, ता. राजापूर, जि. रत्नागिरी या पत्त्यावर अर्ज सादर करावा.
संविधानातील विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत व तरुणाईत लोकशाही मूल्यांचा प्रसार व्हावा, हा या स्पर्धेचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

