(लांजा)
लांजा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अरबाज हाजीमिया नेवरेकर यांना नुकताच आधार सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र तर्फे आयोजित नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड – 2025 साठी ‘राष्ट्रीय आदर्श समाजसेवा रत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
अरबाज नेवरेकर हे लांजा येथील बुजुर्ग नेते पै. युनूस भाई नेवरेकर यांचे भाचे आहेत. कॉलेज जीवनापासूनच त्यांना समाजसेवेची आवड असून, युनूस भाई नेवरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समाजकार्याची बाळकडू घेतले आहे. अपघात असो किंवा रक्ताची गरज भासली, अशा प्रत्येक प्रसंगी ते तत्परतेने गरजूंना मदत करण्यासाठी धावून जातात.
पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ५ ऑक्टोबर २०२५, रोजी दुपारी १ वाजता रिजेन्शा प्लेस, रायसन्स हॉटेल, ताराबाई पार्क, पंचशील हॉटेल जवळ, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे स्वरूप कोल्हापुरी पेटा, श्रीफल, सन्मान चिन्ह, गौरव पत्र, पदक असे राहणार आहे.
शांत, संयमी आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्वामुळे, तसेच नेवरेकर कुटुंबातील युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय समाजसेवा रत्न पुरस्काराने रत्नागिरी जिल्हा आणि विशेषतः लांजा तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदन आता वर्षाव केला जात आहे.

