(गुहागर / सचिन कुळये)
तवसाळ पंचक्रोशीतील महिला भातशेती, कापणी आणि तयारीच्या कामात व्यस्त असताना ते बाजूला ठेवून एक दिवसाचा नऊ मंदिरात दर्शनासाठी योग जुळून आला.
गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पडवे पंचायत समिती गणातील तवसाळ, कुडली, नवानगर गावातील नारीशक्तींना नवदुर्गा देवी शक्तींचे दर्शन व्हावे यासाठी जि.प.चे माजी सदस्य महेश नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना पक्षाचे गुहागर तालुका विधानसभा क्षेत्र समन्वयक विपुलदादा कदम यांच्या सौजन्याने पंचायत समिती गणातील महिला नवदुर्गा शक्तींच्या दर्शनासाठी गुहागर तालुक्यातील आबलोली येथून तीन बस गाड्यांनी रवाना झाल्या. या उपक्रमातून महिलांना धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांची जाणीव करून देण्याचा उद्देश होता.
या धार्मिक सोहळ्यादरम्यान गावातील महिलांनी नवदुर्गा शक्तींचा गौरव करत, देवीचा महिमा गात, विविध मंत्र आणि स्तोत्रांचे पठण केले, यामुळे परिसर भक्तिभावाने फुलून गेला होता.
या उपक्रमामुळे गावातील नारीशक्तीला एकत्र आणण्यास मदत झाली आणि धार्मिक व सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धनही झाले.

