( चिपळूण )
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत (१९ वर्षांखालील मुली) कबड्डी प्रकारात श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालय, चिपळूण येथील विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला.
अंतिम सामन्यात त्यांनी गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (रत्नागिरी) विरुद्ध अटीतटीच्या लढतीत विजय मिळवत जिल्हा पातळीवर चमकदार यश संपादन केले.
या स्पर्धेत गौरी कांबळी, खुशी जोगळे, समिक्षा पवार, आर्या नांदलस्कर, समृद्धी बुरटे, नीरजा लवेकर, सानवी वाघे, सानिया पठाण, समृद्धी महाडीक, आर्या चव्हाण, रिया उदेग, सुजाता पवार या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ कौशल्य, चिकाटी आणि क्रीडाभाव दाखवत विजेतेपद निश्चित केले.
खेळाडूंना विशेष मार्गदर्शन प्रा. रुपेश भालेकर यांनी केले. या यशाबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कॉलेजचे चेअरमन मल्लेश लकेश्री, कार्यवाह प्रशांत देवळेकर, कोषाध्यक्ष सिद्धेश लाड, रजिस्ट्रार अजित खेडेकर, पी.आर.ओ. योगेश चोगले, प्राचार्या सौ. अरुणा सोमण मॅडम, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचा सत्कार करून अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

