(मंडणगड)
प्राथमिक आरोग्य केंद्र कुंबळे अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र, सोवेली येथे ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ विशेष अभियानांतर्गत महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र कुंबळेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुळवे यांनी महिलांना आरोग्य जपण्यासाठी आवश्यक बाबींविषयी जनजागृती व समुपदेशन केले.
शिबिरात महिलांची उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग, ॲनिमिया, सिकलसेल स्क्रीनिंग, गर्भवती मातांची तपासणी, तसेच मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर आहार पद्धतीविषयी मार्गदर्शन, ECG तपासणी, आणि आयुष्यमान भारत–प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) कार्ड e-KYC नोंदणीसह SNSP अॅपवर एंट्री करण्यात आली. महिला व बालकांना पोषण आहाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले तसेच आयुष व योग सत्र घेण्यात आले.
कार्यक्रमाला सोवेली ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. संकेत सुनिल तांबे, सदस्य व मान्यवर उपस्थित होते. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी सौ. प्रियांका महादेव अथणी, श्री. राजेंद्र खरमाटे, आरोग्य सेवक श्री. शरद सापटे, श्री. सचिन सापटे, श्री. रणजीत दुर्गवले, आरोग्य सेविका सौ. सरस्वती गायकवाड, सौ. कल्पना शीद, सौ. श्रीदेवी मठ (लॅब टेक्निशियन), गट प्रवर्तक सौ. साक्षी सापटे, आशा सेविका सौ. समीक्षा कदम, सौ. मनीषा खैरे, तसेच सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गटाच्या CRP, ग्रामपंचायत शिपाई श्री. दळवी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

