मौजे असुर्डे – कोंड असुर्डे नदीवरील कॉजवे झालाय धोकादायक; दुरुस्ती न करता नवीन पूल उभारण्याची मागणी
(संगमेश्वर / एजाज पटेल) मौजे असुर्डे आणि कोंड असुर्डे या दोन गावांमधून वाहणाऱ्या नदीवरील कॉजवेची पार दयनीय अवस्था झाली आहे. डिंगणी -शास्त्रीपुल मुख्य मार्गावरून संगमेश्वर येथे येण्यासाठी अगदी जवळचा मार्ग…
समाज कल्याण विभागाच्या २१९ पदांसाठी १ लाख ८७ हजार उमेदवार देणार परीक्षा
(पुणे) समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील २१९ विविध पदांच्या जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. राज्यातील ५६ केंद्रावर ऑनलाइन परीक्षा सुरु झाल्या असून दि. १९…
प्रधानमंत्री पोषण शक्ती आहार योजनेतील अनुदानात वाढ
(मुंबई) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आहार योजनेतील अनुदानात मोठी वाढ करण्यात आली आहे. प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांच्या आहारासाठी ७४ पैसे आणि उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांच्या आहारासाठी एक रुपया १२ पैसे दरवाढ…
गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात वनतारा प्राणी संग्रहालय उभारणार – वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती
(मुंबई) गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात वन्यप्राण्यांसाठी वनतारा प्राणीसंग्रहालय उभारले जावे, यासाठी उद्योगपती अनंत अंबानी यांना पत्र लिहिणार असल्याचे तसेच याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला देणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी…
राज्यातील सर्व शाळांमध्ये वार्षिक व PAT परीक्षा एकाच वेळी; परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
(पुणे) राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी २०२४-२५ मध्ये वार्षिक परीक्षा व संकलित चाचणी- २ (नियतकालिक मूल्यांकन चाचणी PAT) चे (Annual Examination and Comprehensive Test 2) वेळापत्रक प्रसिद्ध (Schedule released) करण्यात आले आहे.…
औषधांबाबत रुग्णालयांची दुकानदारी सुप्रीम कोर्टाच्या रडारवर !
(नवी दिल्ली) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी किफायती दरात औषधे आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरल्यावरून राज्यांना फटकारले. तसेच खासगी रुग्णालयाकडून होणारी रुग्णांची लूट थांबवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश…
कबुतरांपासून मानवाला ६० वेगवेगळे आजार होण्याचा धोका
शहरी भागात कबुतर हे सामान्य दृश्य आहे, तुम्हाला ते छतावर बसलेले, बाल्कनीत वेगाने पंख फडफडवणारे किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे दिसतील. ते निरुपद्रवी दिसत असले तरी, त्यांच्या विष्ठेमध्ये लपलेले धोके…
जि.प.चे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर
(रत्नागिरी) जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षी कनिष्ठ व वरिष्ठ अशा एकूण १८ शाळांना पुरस्कार देण्यात आले आहेत. उत्कृष्ट काम करणाऱ्या शाळांना दरवर्षी जिल्हा परिषदेतर्फे आदर्श शाळा…
अर्जुना धरणाच्या कालव्यात बुडुन एकाचा मृत्यु
( राजापूर ) पाचल कोंडवाडी येथील सीताराम भगवान चौगुले (वय ५५) यांचा पाचल येथील अर्जुना धरणाच्या उजव्या कालव्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. सीताराम चौगुले हे शेळ्या चरण्यासाठी…
संगमेश्वरातील सरदेसाई वाड्याचे होणार स्मारकात रूपांतर : देवेंद्र फडणवीस
(मुंबई) छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरातील सरदेसाई वाड्यात कैद झाली होती. आजही या वाड्याचे अवशेष आहेत. हा वाडा अधिग्रहित करून तिथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

