(चिपळूण)
चिपळूण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासासह स्मार्ट सिटीच्या दृष्टीने आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी आ. चव्हाण यांनी चिपळूणच्या विकासासाठी भाजपकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, असा विश्वास नगरसेवकांना दिला.
चिपळूण नगरपरिषद निवडणूक भाजप-शिवसेना युतीतर्फे लढवण्यात आली होती. भाजपने या निवडणुकीत ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्यापैकी ७ उमेदवारांनी दमदार विजय मिळवत मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जागा वाढवल्या. या निवडणुकीची जबाबदारी भाजप नेते तथा निवडणूक संयोजक प्रशांत यादव यांच्याकडे होती. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी समन्वय साधत यादव यांनी उमेदवारांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये अनिकेत पटवर्धन यांचेही सहकार्य लाभले.
निवडणुकीनंतर भाजप नेते प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या समवेत नवनिर्वाचित नगरसेवकांनी आ. रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली व पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतले.
यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, शिक्षक संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल भोबस्कर, तालुकाध्यक्ष विनोद भूरण, शहराध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवक शशिकांत मोदी, महिला मोर्चा शहराध्यक्षा व नवनिर्वाचित नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, नगरसेविका सौ. वैशाली निमकर, सौ. रूपाली दांडेकर, सौ. अंजली कदम, नगरसेवक शुभम पिसे, संदीप भिसे, माजी नगरसेवक विजयराव चितळे, पंचायत राज जिल्हा संयोजक योगेश शिर्के, अभिजित जागुष्टे, बापू कांबळी, कुणाल आंबेकर, प्रशांत यादव यांचे स्वीय सहाय्यक गुलजार गोलंदाज, विनोद चव्हाण आदी उपस्थित होते.

