सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड
(मुंबई) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी ५ वाजता मुंबईत त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधीपूर्वी…
देव, घैसास, कीर महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन
(रत्नागिरी) भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा या विषयी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेमध्ये प्रमुख अतिथी…
रत्नागिरी: सन्मित्रनगरमधील घरफोडीत ६ लाखांहून अधिक किमतीचे दागिने चोरीला
(रत्नागिरी) रत्नागिरी शहरातील सन्मित्रनगर परिसरात बंद असलेल्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख ७ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली…
मजगाव रोड येथे दुचाकी अपघात; पाठीमागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू
(रत्नागिरी) करबुडे येथून रत्नागिरीकडे येणाऱ्या दुचाकीचा मजगाव रोड परिसरात झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. ३०) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या…
सेंट थॉमस स्कूलच्या वैष्णवी पडवळेची महाराष्ट्र अस्मिता खेलो इंडिया फुटबॉल संघात निवड
(रत्नागिरी) कारवांचीवाडी येथील सेंट थॉमस स्कूलच्या वैष्णवी प्रतिप पडवळे हिची महाराष्ट्राच्या अस्मिता खेलो इंडिया फुटबॉल संघात निवड झाली आहे. सेंट थॉमस स्कूल फुटबॉल संघातून एकूण ६ मुलींची राज्य शिबीरासाठी निवड…
राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन “आरोहण 2k26” चे उद्घाटन संपन्न
(रत्नागिरी) तालुक्यातील प्र. शि. संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २८ व्या वार्षिक स्नेहसंमेलन “आरोहण 2के26” चे उद्घाटन संपन्न झाले. आंतरमहाविद्यालयीन कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश असलेल्या या महोत्सवाच्या उद्घाटन…
मेर्वीतील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची सुरुवात शनिवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी…
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री शपथविधीबाबत मला माहिती नाही – शरद पवार
१२ फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण ठरले होते
TWJ घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार समीर नार्वेकर पत्नी नेहासमवेत अटकेत; ठाणे पोलिसांची मोठी कारवाई
(ठाणे) राज्यातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, राजकारणी, मंत्री-आमदार तसेच आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या TWJ कंपनीचा मालक व व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि…
तेर्ये येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील गेल्ये यांना ‘विश्व समता’ राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये गावचे सामाजिक कार्यकर्ते सुनील गेल्ये यांची विश्व समता कलामंच, लोवले (संगमेश्वर) या सामाजिक संस्थेच्या वतीने “विश्व समता राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार” साठी निवड करण्यात…

