ग्रामपंचायत कार्यालयात ज्येष्ठ नागरिकाला मारहाण; जातिवाचक वक्तव्याचा आरोप
(राजापूर / तुषार पाचलकर) पाचल ग्रामपंचायत कार्यालयात पत्नीला मदत करण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करण्यात आल्याची आणि त्यांच्यासह पत्नीला उद्देशून अपमानास्पद व जातिवाचक वक्तव्य केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.…
केरळमध्ये मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात पाऊस केव्हा?
(नवी दिल्ली) नैऋत्य मान्सून अखेर केरळमध्ये अधिकृतपणे दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने (IMD) आज (गुरुवारी) केली. गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू असला तरी आता मान्सूनच्या आगमनावर अधिकृत…
बेदखल कुळांना न्याय द्या; बहुजन विकास आघाडीचे लांजा तहसीलदारांना निवेदन
(रत्नागिरी) मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमातील कलम ४(२) मधील दुरुस्तीची प्रभावी अंमलबजावणी करून बेदखल कुळांना न्याय मिळावा, अशी मागणी बहुजन विकास आघाडीतर्फे लांजा तहसीलदार श्रीमती प्रियांका ढोले यांच्याकडे करण्यात आली.…
राजापूर पूर्व मंडळाच्या तालुका सरचिटणीसपदी समीर खानविलकर यांची नियुक्ती
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील पाचल गावचे सुपुत्र समीर खानविलकर यांची भारतीय जनता पार्टीच्या राजापूर पूर्व मंडळ तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजापूर येथे झालेल्या कार्यक्रमात विधानपरिषदेचे आमदार…
पोचरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील पोचरी गावात अल्पवयीन मुलीशी अश्लील गैरवर्तन करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे पोचरी गावासह फुणगूस खाडी परिसरात संतापाची लाट उसळली…
बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी; उमेदवारी माघारीनंतर उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई
( मुंबई ) रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ठाकरे गटाने…
कोकण विधान परिषद निवडणुकीत नाट्यमय कलाटणी; बाळ माने यांची माघार, चुरशीच्या लढतीची शक्यता अखेर मावळली
(रत्नागिरी /प्रतिनिधी) रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेरच्या क्षणी मोठी राजकीय घडामोड घडली. महाविकास आघाडीकडून शिवसेना (ठाकरे गट)चे उमेदवार असलेले सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज…
मध्यरात्री कारला भीषण आग; दुचाकीही जळाली
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहरातील प्रशांत नगर–स्वरूपानंद नगर परिसरात ३ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली…
‘रोजगाराला अडथळा, अतिक्रमणांना मोकळे रान?’; हातगाडी प्रकरणाने सोशल मीडियावर रत्नागिरी नगर परिषद धारेवर
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील मुख्य टपाल कार्यालयासमोरील परिसरात मसाला दुधाची हातगाडी सुरू करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला ती हटविण्यास भाग पाडल्याचा आरोप समोर आल्यानंतर रत्नागिरी नगर परिषद पुन्हा एकदा वादाच्या…
‘आई बसमध्ये चढण्यापूर्वीच बस सुटली’; वादातून वाहक-प्रवासी संघर्ष, गुन्हा दाखल
(लांजा/ रत्नागिरी) लांजा एस.टी. स्थानकावर बस सुटण्याच्या घाईत निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर वाहक आणि प्रवाशामधील संघर्षात झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी एस.टी. वाहकाच्या फिर्यादीवरून एका प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल…

