(नवी दिल्ली)
आज (२२ सप्टेंबर)पासून जीएसटी दरात मोठा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे अनेक वस्तू आणि सेवांवर करात कपात होईल. स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तू, औषधे, उपकरणे आणि ऑटोमोबाईलसह विविध उत्पादनांच्या किमती कमी होणार आहेत. हा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त जीएसटी परिषदेकडून घेण्यात आला, आणि तो आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लागू होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (21 सप्टेंबर) संध्याकाळी पाच वाजता देशातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी आजपासून (22 सप्टेंबर) देशात जीएसटी बचत उत्सव सुरू होणार असल्याची घोषणा केली. तसंच आत्मनिर्भर भारताचा उल्लेख करत जीएसटीच्या दरातील कपातीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. दरम्यान, आजपासून स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत, औषधे आणि उपकरणे ते ऑटोमोबाईलपर्यंतच्या किंमती स्वस्त होणार आहेत. कारण, जवळपास 375 वस्तूंवरील कमी केलेले जीएसटी आजपासून दर लागू होतील.
तूप, पनीर, बटर, नमकीन, केचप, जाम, सुकामेवा, कॉफी, आणि आईस्क्रीम यासारख्या अत्यंत वापरल्या जाणाऱ्या वस्तू स्वस्त होतील. याचप्रमाणे टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन सारख्या महत्त्वाच्या उपकरणांच्या किमतीतही घट होईल. जीएसटी दर सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने विविध एफएमसीजी कंपन्यांनी आधीच आपल्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे.
औषधे आणि वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी कमी
केंद्र सरकारने औषधांवरील जीएसटी दर ५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे, ज्यामुळे सामान्य माणसाला औषधांच्या किमती कमी होण्याचा फायदा होईल. त्याचप्रमाणे ग्लुकोमीटर, डायग्नोस्टिक किट्स आणि इतर वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटीही कमी केला आहे. यामुळे दवाखान्यांमधील उपचार आणि निदानाची किमतही कमी होईल.
सिमेंट आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी दिलासा
सिमेंटवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याने गृहनिर्माण व्यावसायिकांना मोठा फायदा होईल, तसेच घरांच्या बांधकामाच्या किमतीतही घट होईल.
ऑटोमोबाईल क्षेत्राला लाभ
ऑटोमोबाईल खरेदीदारांसाठी हा जीएसटी कपात हा मोठा दिलासा आहे. छोट्या आणि मोठ्या कारवर क्रमशः १८% आणि २८% जीएसटी लागू करण्यात आले आहे, ज्यामुळे कार कंपन्यांनी किमती कमी करण्याची घोषणा केली आहे.
सेवांवर कमी कर
सौंदर्य आणि शारीरिक कल्याण सेवांसाठी जीएसटी १८% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ क्लब, सलून, फिटनेस सेंटर, योग आणि इतर शारीरिक सेवांचा समावेश आहे.
दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होणार
केसांचे तेल, साबण, शॅम्पू, टूथब्रश, टूथपेस्ट, तसेच टॅल्कम पावडर आणि आफ्टर-शेव्ह लोशन यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर सध्याच्या १२% किंवा १८% दरांवरून ५% जीएसटी लागू होईल. यामुळे लोकांना या वस्तू स्वस्त मिळतील.
लक्झरी वस्तूंवरील कर वाढ
तथापि, काही वस्तूंवर करात वाढ होणार आहे. तंबाखू, पान मसाला, गुटखा, सिगारेट आणि इतर हानिकारक पदार्थांवरील जीएसटी २८% वरून ४०% पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच, कार्बोनेटेड शीतपेये, कॅफिनेटेड पेये आणि फळांवर आधारित शीतपेय यांवरही ४०% कर आकारला जाईल.
उच्च किमतीच्या लक्झरी वस्तू महाग होणार
१२०० सीसी आणि १५०० सीसीपेक्षा जास्त इंजिन असलेल्या एसयूव्ही आणि मोठ्या कारवर ४०% जीएसटी लागेल. याचप्रमाणे ३५० सीसीपेक्षा जास्त मोटारसायकली, नौका, खासगी विमाने आणि रिव्हॉल्व्हर/पिस्तूल सारख्या उच्च किमतीच्या वस्तू देखील ४०% जीएसटी श्रेणीमध्ये येतील.
इतर करवाढीच्या बाबतीत:
- कोळसा, लिग्नाइट, पीट यांवर ५% ऐवजी १८% जीएसटी लागू होईल.
- डिझेलमध्ये न मिसळलेला बायोडिझेल १२% वरून १८% पर्यंत वाढवला जाईल.
- २,५०० रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम कपडे आणि कापडावरही १८% जीएसटी आकारला जाईल.
दैनंदिन जीवनावश्यक वस्तू
- यूएचटी दूध, पनीर, पराठे, पिझ्झा ब्रेड, खाखरा आणि रोटी जीएसटीमधून वगळण्यात आलं आहे.
- बटर, तूप, चीज, जाम, सॉस, सूप, पास्ता, नमकीन आणि मिठाईवर आता 12/18 टक्क्यांवरून 5 टक्के कर आकारण्यात आला आहे.
- सुकामेवा, खजूर आणि लिंबूवर्गीय फळांवर देखील 5 टक्के कर आकारला जाणार आहे.
आरोग्यसेवा
- अॅगल्सिडेस बीटा, ओनासेम्नोजीन, डारातुमुमॅब आणि अॅलेक्टिनिब सारखी जीवनरक्षक औषधं आता करमुक्त असणार आहेत.
- बहुतेक औषधं, वैद्यकीय उपकरणं, डायग्नोस्टिक किट, बँडेज, थर्मामीटर आणि ऑक्सिजनवर 12/18 टक्क्यांऐवजी 5 टक्के कर आकारला जाईल.
- धोक्यापासून संरक्षण वाढवण्यासाठी सर्व वैयक्तिक जीवन आणि आरोग्य विमा पॉलिसींवर कोणताही कर आकारला जाणार नाही.
ग्राहकोपयोगी वस्तू
- हेअर ऑईल, शाम्पू, टूथपेस्ट, साबण, शेव्हिंग प्रोडक्ट्स, टॅल्कम पावडर, टूथब्रश, कॅनडल्स आणि सेफ्टी मॅचवर आता फक्त 5 टक्के जीएसटी आकारला जाईल.
- नोटबुक, पेन्सिल, शार्पनर आणि इरेजर सारख्या स्टेशनरी वस्तू देखील स्वस्त होतील.
वाहतूक आणि गृहनिर्माण
- सिमेंटवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
- ट्रॅक्टर, सायकली, 350 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या बाईक्स, लहान कार, इलेक्ट्रिक व हायब्रिड वाहनं आणि रुग्णवाहिका यांच्यावरील कर कमी करण्यात येणार आहे.
- संगमरवरी, ग्रॅनाइट ब्लॉक आणि पर्यावरणपूरक बांधकाम साहित्यांवरही फक्त 5 टक्के कर आकारण्यात येणार आहे.
महाग काय होणार?
- तंबाखू आणि हानिकारक वस्तू
- पान मसाला, गुटखा, तंबाखू आणि सिगारेटवर आता 28 टक्क्यांवरून 40 टक्के जीएसटी लागेल.
कार्बोनेटेड/एरेटेड सॉफ्ट ड्रिंक्स, कॅफिनेटेड पेये आणि फळांवर आधारित फिजी ड्रिंक्सवर देखील 40 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.
लक्झरी वस्तू
- 1200 सीसी/1500 सीसीपेक्षा जास्त इंजिन असलेल्या एसयूव्ही आणि मोठ्या कारवर 40 टक्के जीएसटी आकारला जाईल.
- 350 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक्स, नौका, खाजगी विमानं आणि अगदी रिव्हॉल्व्हर आणि पिस्तूल यावर देखील 40 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.
इतर वस्तूंवरील दरवाढ
- कोळसा, लिग्नाइट आणि पीट यांसारख्या इंधनावरील कर 5 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
- बायोडिझेलवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.
- प्रीमियम कपडे आणि कापड प्रति तुकडा 2500 रुपयांपेक्षा जास्त आणि उच्च-मूल्य असलेल्या
- कापसाच्या रजाईवर देखील 18 टक्क्यांपर्यंत जीएसटी वाढवण्यात आला आहे.
- अनकोटेड आणि क्राफ्ट पेपरसह काही कागदी उत्पादनांवर आता 18 टक्के जीएसटी आकारला जाईल.

