( गुहागर )
खालचापाट येथील भक्तांच्या हाकेला धावणारी श्री देवी वरातीच्या शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त आजपासून दि. 22 ते दि. 27 सप्टेंबर पर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा शारदीय नवरात्र उत्सव यशस्वी करण्यासाठी श्री देवी वराती देवस्थान युवा मंडळ गुहागर खालचापाट मेहनत घेत आहेत.
नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून सकाळी देवीची पूजा, संध्याकाळी आरती, त्यानंतर भजन, जाखडी नृत्य, देवीचा महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. श्री देवी वराती मंदिरात होणाऱ्या या नवरात्रोत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी वराती देवस्थान युवा मंडळ गुहागर खालचापाट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

