(रत्नागिरी)
२० सप्टेंबर आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिन या दिनाचे औचित्य साधून पूर्णगड ता.रत्नागिरी या समुद्रकिनारा परिसराची स्वच्छता सागरी सीमा मंच दक्षिण रत्नागिरी यांच्यामार्फत स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात पूर्णगड ग्रामस्थ, पालक, पूर्णगड मराठी नं.१शाळा, पूर्णगड खारवीवाडा शाळा, पूर्णगड उर्दू शाळा यांचे शिक्षक , विद्यार्थी,अंगणवाडी सेविका, सरकारी कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. व सागरी किनारा परिसर स्वच्छ केला
सदर उपक्रम यशस्वीतेसाठी श्री पावसकर, गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री वासुदेव वाघे, श्री दादा वाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाध्ये सहभागी सर्वांचे आभार मानून या उपक्रमाची सांगता झाली.

