(जाकादेवी / संतोष पवार)
फेब्रुवारी- मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी व इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय येथील केंद्रावर सुरळीत सुरू असून या केंद्रावर बारावी परीक्षेसाठी ३३० विद्यार्थी तर इयत्ता दहावी परीक्षेसाठी २९४ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.
या इयत्ता बारावी केंद्राचे केंद्र संचालक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक नितीन मोरे तर केंद्राचे उपसंचालक म्हणून ज्येष्ठ शिक्षक अरुण कांबळे हे काम पाहत आहेत .इयत्ता दहावी केंद्राचे केंद्र संचालक म्हणून ज्येष्ठ शिक्षक संतोष पवार तर केंद्राचे उपसंचालक म्हणून शाळेतील गणित विषयाचे शिक्षक अनिल पाटील काम पाहत आहेत.या दोन्ही केंद्रावर मिळून ६२४ विद्यार्थी परीक्षेला बसले असून ग्रामीण भागातील मोठे परीक्षा केंद्र म्हणून या केंद्राकडे पाहिले जाते. जाकादेवी केंद्रावर परीक्षा अतिशय शांततेत व सुरळीतपणे सुरू आहे.
माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तसेच कोकण बोर्डाअंतर्गत भरारी पथक यांनी भेटी देऊन या केंद्राविषयी समाधान व्यक्त केले. या केंद्रावर आवश्यक सर्व सोयी सुविधा पुरवण्याचे महत्त्वपूर्ण काम मालगुंड शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
नियोजित परीक्षा शासकीय बोर्ड परीक्षा संहितेच्या आधारे कस्टोडीयन म्हणून रत्नागिरी शिक्षण विभाग शिक्षण विस्तार अधिकारी भाग्यश्री हिरवे, तर सहाय्यक कस्टोडीयन म्हणून खंडाळा येथील शिक्षक सुनिल कांबळे, रामदास पालशेतकर अतिशय नेटाने व जबाबदारीने कार्यभार सांभाळत आहेत.
विविध केंद्रांवर परीक्षा यशस्वी करण्यासाठी रनर म्हणून संदखोलचे केंद्रप्रमुख अरविंद महाकाळ, जाकादेवीचे राहुल यादव, सैतवडेचे नितीन जाधव, मालगुंडचे मिलिंद सुर्वे, जयगडचे विवेकानंद शेंडगे, आगरनरळचे सुखदेव गोडसे, विल्येचे आशिष सावंत तर कर्मचारी म्हणून मंगला चावरे व विनायक कोळवणकर इ.वाटद- खंडाळा कस्टडी ६७ मुख्य केंद्राअंतर्गत कार्यरत आहेत. तसेच केंद्रातील सहभागी शाळांचे सर्व मुख्याध्यापक व पर्यवेक्षक व केंद्राचा स्टाफ यांचे उत्तम सहाय्य मिळत आहे.

