(संगमेश्वर / वार्ताहर)
चाफवली गावातील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश चाळके यांची सलग सातव्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. गेल्या सहा वर्षांप्रमाणे याही वर्षी गावकऱ्यांनी एकमुखाने त्यांच्यावर विश्वास टाकला.
यावेळी गावच्या सरपंच सौ.आरोही रावण, उपसरपंच विजय घुमे, माजी उपसरपंच सुरेश चाळके, पोलीस पाटील विजय चाळके, ग्रामसेवक माईन, तलाठी श्रीहरी लांब, संजय चाळके शांताराम धुमक, अनंत दळवी, सीताराम रावण, प्रकाश रसाळ, श्री रणसे, यादव, काशिनाथ भातडे, सुरेश पाटोळे, प्रज्योत चाळके, प्रतीक चाळके, राजाराम लिगम, संतोष गावडे, सीताराम गावडे, हरीश कांबळे, नितीन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी एकमताने प्रकाश चाळके यांची निवड जाहीर केली.
कोरोना काळापासून गावात केलेल्या कार्यामुळे ग्रामस्थ त्यांच्यावर समाधानी असून, पुढेही गावकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असे आश्वासन प्रकाश चाळके यांनी निवडीनंतर व्यक्त केले.

