(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर डिंगणी खाडेवाडी गुरववाडी गाडी वेळेत सुटत नसल्याने गावातील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. याचा फटका गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, वयोरुद्ध, शाळेतील मुलं यांना बसत आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी काल डिंगणी अगरवाडी येथे बैठक घेऊन खाडेवाडी, अगरवाडी, करंडेवाडी, काष्टेवाडी, जाधववाडी, क्रांतीनगर (वरची बौद्धवाडी )येथील ग्रामस्थांनी संगमेश्वर आणि देवरुख या डेपोला आक्रमक पवित्रा घेत भेट घेऊन निवेदन दिले. जर ही गाडी वेळेत नाही सुटली तर सर्व गावाला घेऊन आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
यावेळी वामन काष्टे (गावकर), श्रीपत खाडे (गावकर) पांडुरंग पेजे (गावकर, मा.पोलीस पाटील),यशवंत करंडे (करंडेवाडी वाडीप्रमुख), बुद्धदास कदम (क्रांतीनगर अध्यक्ष), तुकाराम पाकतेकर (माजी सरपंच), सुदर्शन मोहिते (मा. ग्रामपंचायत सदस्य), जितेंद्र जोगळे (पोलीस पाटील), कृष्णा खाडे, अनंत काष्टे, विश्वनाथ जोगळे, विवेक मोहिते, प्रकाश जाधव, चंद्रकांत गावडे, विजय जाधव, विशाल कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

