(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गा वरील शास्त्री पूल आंबेड येथून डिंगणी -करजुवे मार्गाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बारा चाकी ट्रक वळवताना चिखलात रुतल्याने पूर्ण रस्ता बंद झाला आहे. यामुळे या मार्गांवरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. शास्त्री पूल आंबेड येथून डिंगणी -फुणगूस पुलामार्गे गणपतीपुळे व जयगडकडे जाणाऱ्या गाडी चालकांनी त्यांच्या गाड्या राष्ट्रीय महामार्गवरून वळवल्या.
मुख्य रस्त्यावर चिखलात बारा चाकी मोठे वाहन रुतल्याने पूर्ण रस्ता बंद झाल्याने या मार्गांवररून धावणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. जेसीबी द्वारे चिखलात रुतलेली गाडी काढण्याचे प्रयत्न सुरु असून त्यात लवकर यश आले नाही तर या मार्गावरून कोंडये, डिंगणी, करजुवे या मार्गांवर धावणाऱ्या एसटी बसेस जाण्यास अडथळा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

