(रत्नागिरी)
कुर्ला टू वेंगुर्ला नावाच्या एका नव्या कोऱ्या मराठी सिनेमा बद्दल आपण याआधी ऐकलं असेलच. कोकणातल्याच अनेक कलाकारांनी मिळून बनवलेली ही फिल्म येत्या 19 सप्टेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त )रत्नागिरी मध्ये सुप्रसिद्ध अभिनेते श्री. वैभव मांगले सर, सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीम. वीणा जामकर निर्माता चारुदत्त सोमण , वेनतेय जोशी आणि कुर्ला टू वेंगुर्लाची टीम आपल्या सर्वांसोबत संवादासाठी उपस्थित होते.
गोगटे जोगळेकर महाविद्यालय मधील बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स विभागाचे विद्यार्थी चित्रपट निर्मिती आणि कलम क्षेत्रातील अनेक विषयांवर सर्वांशी संवाद साधला. भविष्यामध्ये कोकणामध्ये चित्रपट निर्मिती आणि त्याचे व्यावसायिक वितरण कोकणाच्या उद्देशाने हे खूप महत्त्वाचे पाऊल होते. चित्रपट निर्मितीसाठी गेली पंचवीस वर्षे काम सुरु आहे त्यातूनच या चित्रपटाची निर्मिती झाली आहे असे निर्माता चारुदत्त सोमण यांनी आपले मत व्यक्त केले. गोगटे कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स विभाग सुरू झाला आहे त्यासाठी माझे पूर्ण सहकार्य असेल कारण मी याच कॉलेजचा १९८६ चा माजी विद्यार्थी आहे असे त्यांनी सांगितले.
चित्रपटामध्ये यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट आणि प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. स्वतःच्या संघर्षाची माहिती देताना असे सांगितले की, मी आज यशस्वी आहे म्हणून तुम्ही मला ऐकत आहात म्हणून आयुष्याचे बी सी प्लॅन सुद्धा असले पाहिजेत असे आवर्जून प्रसिद्ध अभिनेते आणि कॉलेजचे १९९५ चे माजी विद्यार्थी वैभव मांगले यांनी सांगितले. आपण डॉ.आनंद आंबेकर यांच्या सोबत कॉलेजला असताना अनेक स्पर्धा केल्या आहेत. जुन्या आठवणी आहेत. बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स विभागासाठी वर्क शॉप घेण्यासाठी नक्की येईन असे आपुलकीने सांगितले.
महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.सीमा कदम यांनी बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स विभागाची वाटचाल सांगितली आणि नवीन शैक्षणिक योजनेमुळे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी कॉलेज स्वायत्त असल्याने बहूउद्देशीय अभ्यासक्रम सुरू केल्याचे सांगितले. प्राचार्यांनी आपण सर्वांनी एकत्र मिळून काम करूया असे आवाहन केले.
१९ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वांनी आवर्जून चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पहा असे सर्वांनी आवाहन केले आहे. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे यांनी मार्गदर्शन केले..बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर, प्रा. वेदांग सौंदलगेकर, प्रा. कश्मीरा सावंत, श्री. राजू जोशी सर्व विद्यार्थी यांनी विशेष सहकार्य केले.

