(रत्नागिरी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेश सचिव बशीर मुर्तुझा यांची सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील यांच्या हस्ते मुंबईतील पक्ष कार्यालयात त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे बशीर मुर्तुझा यांच्या नियुक्तीचे सर्वत्र जल्लोषाने स्वागत होत आहे. विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
या प्रसंगी प्रदेशचे श्री. रवींद्र पवार, रत्नागिरी युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी, निलेश कानीटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.