(गुहागर)
दर्यावर्दी प्रतिष्ठान, पालशेत यांच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ४ व ५ मार्च २०२६ रोजी भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होणार असून, उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे. क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पालशेत पंचक्रोशीतील २६ वाडी अध्यक्ष प्रमुख मान्यवर म्हणून लाभणार आहेत.
दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या २५ वर्षांच्या समाजोपयोगी कार्याचा हा गौरवशाली प्रवास रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने साजरा केला जात आहे. सेवाभाव, विश्वास आणि एकजुटीच्या बळावर संस्थेने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, या आनंदोत्सवात नागरिकांच्या उपस्थितीचे संस्थेने आवाहन केले आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
कालावधी : ४ व ५ मार्च २०२६
बुधवार, ४ मार्च २०२६
दु. ४.०० वा. : भव्य क्रीडा ज्योत रॅली
(पोमेंडी फाटा ते दर्यावर्दी प्रतिष्ठान क्रीडानगरी)
सायं. ६.०० वा. : कबड्डी स्पर्धा उद्घाटन समारंभ
सूचना : पहिला सामना सायं. ५.०० वाजता सुरू होईल
गुरुवार, ५ मार्च २०२६
कबड्डी स्पर्धा समारोप व बक्षीस वितरण समारंभ
प्रमुख अतिथी व मान्यवर
अॅड. अपूर्वा बारगोडे – सदस्य, जिल्हा परिषद, रत्नागिरी
श्री. विकास दाभोळकर – अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कष्टकरी खलाशी महासंघ
श्री. प्रणव पोळेकर – सदस्य, पंचायत समिती, गुहागर
श्री. दत्ताराम पाटील – अध्यक्ष, जयभारत मच्छिमार सहकारी सोसायटी लि., पालशेत
स्थळ : दर्यावर्दी प्रतिष्ठान क्रीडानगरी, पालशेत, ता. गुहागर, जि. रत्नागिरी
६ मार्च रोजी रौप्य महोत्सव वर्ष समारोप सोहळा
शुक्रवार, ६ मार्च २०२६
स. ९.०० वा. : श्री सत्यनारायण महापूजा
स. ११.०० वा. : महाआरती
दु. १२.०० वा. : महाप्रसाद
दु. ३.३० वा. : हळदी-कुंकू समारंभ
प्रमुख वक्त्या : सौ. नमिता प्रसन्ना वैद्य
सायं. ७.०० वा. : भजन
रात्री ८.०० वा. : महाआरती
रात्री १०.०० वा. : फटाक्यांची आतषबाजी
रात्री १०.१५ वा. : चौरंगी नमन व वगनाट्य
(माऊली महिला नमन मंडळ, रत्नागिरी सादर करीत आहे – पौराणिक ‘सीता स्वयंवर’)
या निमित्ताने आयोजित सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून रौप्य महोत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

