( संगमेश्वर / प्रतिनिधी )
राज्यातील अंशतः अनुदानित तत्वावर सुरु असलेल्या प्राथमिक,माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना १ ऑगस्ट २०२५ पासून वाढीव २०% वेतन अनुदानाचा टप्पा देण्याचा निर्णय घेतला.त्यासंबंधीचा शासन निर्णय २५ ऑगस्ट २०२५ रोजी निर्गमित करण्यात आल्या.यासंबंधीची अमलबजावणी करण्याचे आदेश पुणे येथील शिक्षण संचालक डॉ महेश पालकर यांनी दिले.
शिक्षण संचालक पुणे यांचे आदेश मिळताच कोल्हापूर शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी कोल्हापूर विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित शाळांचे वाढीव टप्प्यासाठी प्रस्ताव मागवून घेतले आहेत.
कोल्हापूर विभागात काही अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालये २०% वरून ४०% साठी पात्र झाली आहेत तर काही अंशतः अनुदानित कनिष्ठ महविद्यलये ४०% वरून ६०% वेतन अनुदान घेण्यासाठी पात्र ठरत आहेत. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार व शासकीय धोरणानुसार लाभार्थ्यांच्या खात्यात सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर पगार करत असताना वाढीव २०% नुसार मिळणार आहे.शिवाय ऑगस्ट चा फरक देखील याचं पगारात निघणार आहे. यामुळे कोल्हापूर विभागातील, लाभार्थी अंशतः अनुदानित शिक्षक, शासकीय ध्येय धोरणापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षण उपसंचालक महेश चोथे काळजीपूर्वक फास्ट ट्रॅक वर कार्यवाही करताना दिसत आहेत. या संपूर्ण प्रक्रिया सुलभ होण्यासाठी सहाय्यक शिक्षण उपसंचालक श्रीमती स्मिता गौंड,अधिकारी हणमंत बिराजदार, व अन्य अधिकारी वर्ग मेहनत घेत आहे.
कोल्हापूर विभागातील,१६ रोजी सातारा व रत्नागिरी, १७ रोजी सिंधुदुर्ग, सांगली, व १८ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव स्वीकारण्याचे शिबीर सकाळी १० ते ५ या वेळेत कोल्हापूर एस एस सी बोर्ड येथे होणार आहे. यासंबंधीचे पत्र शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी १० सप्टेंबर रोजी विभागातील सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांना पाठवले आहे.
गत टप्पा वाढीवेळी मार्च २०२३ मध्ये कोल्हापूर उपसंचालक पदी महेश चोथेच होते. त्यावेळी आधार व्हॅलिड विद्यार्थी संख्येवर संच मान्यता होऊन टप्पा वाढ होणार होती. आधार व्हॅलिड विद्यार्थी संख्येवर संच मान्यता होण्याचे त्यावेळी नव्याने सुरु झाल्याने,अनेक् कनिष्ठ महाविद्यालयाना अडचणी येत होत्या. परंतु शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी व्यक्तिगत शिक्षक व कॉलेज ना मार्गदर्शन करून कालमर्यादेपूर्वी संच मान्यता पूर्ण करून टप्पा वाढीचे आदेश २३ मार्च २०२५ रोजी काढले होते. व एप्रिल मध्ये १ जानेवारी २०२३ पासून फरकासह शिक्षकांना पगार मिळाला होता.उपसंचालक महेश चोथे यांच्या लक्षवेधी व कालमर्यादेपूर्वी सुलभरित्या पूर्ण केल्याने कोल्हापूर विभागातील शिक्षकांनी उपसंचालक महेश चोथे यांच्या कार्याबद्दल ऋण व्यक्त केले होते. या कामाची प्रशंसा अख्या महाराष्ट्रातून करण्यात आली होती.यावेळी कोल्हापूर उपसंचालक कार्यालयातील अधिकारी वर्गाने देखील अपार मेहनत घेतली होती.
यावेळी टप्पा वाढीसाठी प्रस्ताव सादर करताना, अचूक पद्धतीने कसे प्रस्ताव सादर करावे याविषयीं उपसंचालक महेश चोथे,सहाय्यक शिक्षण उपसंचालक श्रीमती स्मिता गौंड यांनी शिक्षक वर्गाला मार्गदर्शन केले आहे.शासन निर्णय निर्गमित झाल्यावर कोल्हापूर चे उपसंचालक यावेळीही महेश चोथेच असल्याने कोल्हापूर विभागातील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या चेहऱ्यावर आश्वासक समाधान पाहायला मिळत होते.
कमी वेळात, अचूक, जलद काम कसे करावे व विभागातील लाभार्थ्यांना वेतन अदा होईपर्यंत यंत्रणा कशी राबवावी याचे उत्तम उदाहरणं महेश चोथे यांच्या रूपात मार्च २०२३ मध्ये अंशतः अनुदानित शिक्षकांना पाहायला मिळाले होते. यावेळीही शिबिर त्यांच्याच मार्गदर्शनात होत असल्याने, त्यांच्या सूचनानप्रमाणे विभागातील कनिष्ठ महाविद्यालये अचूक प्रस्ताव बनवणे व सादर करणे या कामाला लागले आहेत. यामध्ये संघटनेचे पदाधिकारी प्रा रत्नाकर माळी, प्रा चंद्रकांत बागणे, प्रा भारत शिरगांवकर, प्रा जयसिंग जाधव, प्रा राहुल यादव, प्रा रावसाहेब पानारी, प्रा मेश्राम, प्रा अमोल धुळप, प्रा अभिजित सुर्वे आदिंसह अन्य पदाधिकारी शिक्षकांना प्रस्ताव तयार करण्याकामी मदत करत आहेत.

