(मुंबई)
भजन सम्राट अनुप जलोटा यांनी ‘मिशन 500’ अभियान सुरू करून 500 नवीन आध्यात्मिक गायकांना प्रशिक्षण व व्यासपीठ देण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत 100 गायकांची निवड झाली असून, उर्वरित निवड लवकरच होणार आहे.
अनुप जलोटा म्हणाले, “माझ्या 63 वर्षांच्या गायन प्रवासात मला अपार प्रेम मिळाले. आता माझं ध्येय 500 गायक घडवण्याचं आहे. ते आपली संस्कृती आणि भक्ती संगीत जगभर पोहोचवतील. हे अभियान केवळ संगीत प्रकल्प नाही, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी भक्तीची ज्योत जिवंत ठेवणारे कुटुंब आहे.”
‘मिशन 500’ हे केवळ एक संगीत कार्यक्रम नसून 500 नवीन भजन गायकांना शोधून त्यांना प्रशिक्षण देण्याची ही एक चळवळ आहे. या उपक्रमातून गायक सनातनी शक्तीचा संदेश समाजात पोहोचवतील आणि भारतीय भक्ती संगीत जागतिक स्तरावर नेतील. या अभियानाचे नेतृत्व द्राक्षा शर्मा तसेच चित्रपट निर्माते अजय जैन आणि संजुक्ता जैन करत आहेत.
या अभियानाचे नेतृत्व द्राक्षा शर्मा, निर्माते अजय जैन व संजुक्ता जैन करत असून, ‘मेरे कृष्णा’ या नव्या भजनातून सिनेमॅटिक स्टोरीटेलिंगद्वारे भक्ती क्षेत्रात नवा प्रयोग करण्यात आला आहे.

