(मुंबई)
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. ठाणे जिल्ह्याचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी, तर पुणे जिल्ह्याचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी निश्चित झाले आहे. साताऱ्यातील अध्यक्षपद मात्र महिला मागासवर्गीय उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाने देशव्यापी सखोल पुनरावलोकन मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परिषद नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमॉक्रसी अँड इलेक्टोरल मॅनेजमेंट येथे घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीरसिंग संधू व डॉ. विवेक जोशी यावेळी उपस्थित होते.
या परिषदेत मतदार यादी, मतदारसंख्या, डिजिटायझेशन, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती व प्रशिक्षणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मतदार यादीत पात्र नागरिक वगळला जाणार नाही आणि अपात्रांचा समावेश होणार नाही, यावर विशेष भर देण्यात आला.
संपूर्ण आरक्षण यादी :
-
कोकण विभाग : ठाणे – सर्वसाधारण (महिला), पालघर – अनुसूचित जमाती, रायगड – सर्वसाधारण, रत्नागिरी – मागास प्रवर्ग (महिला), सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
-
उत्तर महाराष्ट्र : नाशिक – सर्वसाधारण, धुळे – मागास प्रवर्ग (महिला), नंदुरबार – अनुसूचित जमाती, जळगाव – सर्वसाधारण, अहमदनगर – अनुसूचित जमाती (महिला)
-
पश्चिम महाराष्ट्र : पुणे – सर्वसाधारण, सातारा – मागास प्रवर्ग (महिला), सांगली – सर्वसाधारण (महिला), सोलापूर – मागास प्रवर्ग, कोल्हापूर – सर्वसाधारण (महिला)
-
मराठवाडा : संभाजीनगर – सर्वसाधारण, जालना – मागास प्रवर्ग (महिला), बीड – अनुसूचित जाती (महिला), हिंगोली – अनुसूचित जाती, नांदेड – मागास प्रवर्ग, धाराशिव – मागास प्रवर्ग (महिला), लातूर – सर्वसाधारण (महिला), परभणी – अनुसूचित जाती
-
विदर्भ : अमरावती – सर्वसाधारण (महिला), अकोला – अनुसूचित जमाती (महिला), वाशिम – अनुसूचित जमाती (महिला), बुलडाणा – सर्वसाधारण, यवतमाळ – सर्वसाधारण, नागपूर – मागास प्रवर्ग, वर्धा – अनुसूचित जाती, भंडारा – मागास प्रवर्ग, गोंदिया – सर्वसाधारण (महिला), चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला), गडचिरोली – सर्वसाधारण (महिला).

