(दापोली)
तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ल्यात उरुस उत्सवादरम्यान दोन्ही गटांमध्ये भांडण व तुंबळ हाणामारी घडली. या भांडणात एका महिलेचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांना मिळाली असून, तब्बल ५१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची फिर्याद जाहीद अब्दुल रजाक डायली (वय ५२, रा. उंबरशेत-नबी मोहल्ला, केळशी, दापोली) यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार ही घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास केळशी किनारा मोहल्ल्यातील सार्वजनिक इमारतीजवळ (हुजऱ्याजवळ) घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक इमारतीचे कुलूप तोडल्याच्या वादातून त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हाणामारी केली गेली. या मारहाणीत अतिका जाहिद डायली यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेले. हाणामारीत सहभागी झालेल्यांमध्ये जाहीद आणि अतिका डायली यांच्यासह नियाज अब्बास होडेकर, समीर अब्दुल रजाक डायली, नाजमीन मसूर बोरकर, जाकरीन नियाज होडेकर, नियाज अब्बास होडेकर यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी जाकीर इस्माइल होडेकर, अमजद आयुब चाउस, मलिक इक्बाल खमशे, तौफिक मोहिद्दीन मुंडे, फइम इलयास चाउस, मुइज जाकीर होडेकर, अनिसा मलिक खमशे, मसुदा इक्बाल खमशे, अली इलयास चाउस, वहीद आसिफ खमशे, सुहेब हमीद बोरकर, मुफीदा अजहर खमशे, रुक्साना अली खमशे, वसिमा सुहेब बोरकर, इजाज महमद झांजु, दानिश हमीद चाउस यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी केळशी किनारा मोहल्ल्यातील रहिवासी आहेत.
तसेच या प्रकरणी जाकीर इस्माइल होडेकर यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हुजऱ्याच्या कुलुपाच्या चावीचा वाद निर्माण झाला आणि शिवीगाळ करत मारहाण केली गेली. हाणामारीत एजाज झांजु यांची दुचाकी तोडली गेली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अतिका डायली, नाझनीन बोरकर, नायदा डायली, दिलदार खमशे, जैनबी अलबा, हाफिजा डायली, समीर डायली, मसूद बोरकर, जावेद डायली, जावेद झांजु, तौसिफ होडेकर, अकील होडेकर, नियाज होडेकर, नवीद होडेकर, जाफरीन होडेकर, खतीजा होडेकर, मैशम बोरकर, फातीमा बोरकर, झुलेखा बोरकर, मिसबा डायली, मारीया डायली, हाशिम डायली, अमजल बोरकर, शाहीद झांजु, नदीम खमशे, मुजफ्फर होडेकर, सर्फराज होडेकर, गौसीया होडेकर, कमुनीसा खमशे, युसुफ बोरकर, जमीला रज्जाक बोरकर, शाहीद चाउस, रज्जाक हाशमी डायली, रफीय युसुफ बोरकर, शौकत शेख अहमद बोरकर यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

