( कळझोंडी / किशोर पवार )
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १४ येथे रविवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता वर्षावास धम्म मालिकेचे पाचवे पुष्प मालगुंड गावचे सुपुत्र आणि पत्रकारिता लेखक, बौद्धाचार्य आयु.वैभव भिकाजी पवार हे गुंफणार आहेत.
वैभव पवार हे बौद्धाचार्य रविकांत पवार गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहेत. धार्मिक पूजा पाठ घेताना,धम्म संस्कार विधी, धम्म प्रवचन देताना त्यांची स्पष्ट वाणी व मंगलमय असं धार्मिक वातावरण निर्माण करण्याची आयु.वैभव पवार यांची एक आगळीवेगळी ख्याती आहे. रविकांत पवार गुरुजी हे वैभव पवार यांचे गुरू आहेत. ते दोघे ही आपल्या धार्मिक, सामाजिक सांस्कृतिक व कला क्रीडा क्षेत्रात अतिशय उत्तम प्रकारे सेवा भावनेने काम करत आहेत. अनेक शाखांमधून बौद्धाचार्य म्हणून आयु.रविकांत पवार गुरुजी व वैभव पवार यांचा यथोचित गौरव सन्मान केला जातो.
रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती, संस्कार समिती विविध स्थानिक गावशाखा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ही आषाढ पौर्णिमेला वर्षावास कार्यक्रमाला रत्नागिरी शिवाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन सभागृह येथे प्रारंभ करण्यात आला.त्यानंतर मालगुंड,जयगड,पानवळ, या ग्राम शाखेत अतिशय उत्तम प्रकारे पार पाडण्यात आले.
रविवार दिनांक १४ रोजी संपन्न होणा-या धम्म प्रवचन मालिकेला रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे उपक्रमशील व दानशूर सेवाभावी व्यक्तीमत्व आयु.प्रकाश रा.पवार उपाध्यक्ष विजय आयरे, सेक्रेटरी सुहास कांबळे, सहसेक्रेटरी शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, महिला मंडळाच्या पदाधिकारी व संस्कार समितीचे अध्यक्ष आयु.संजय आयरे, सेक्रेटरी रविकांत पवार गुरुजी , सदस्य तसेच कोतवडे बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच महिला मंडळाच्या अध्यक्षा व पदाधिकारी, शाखेतील सर्व धम्म बंधू भगिनी युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत.

