(रत्नागिरी)
भारत सरकारच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे आयोजित कला उत्सव 2025 या स्पर्धेच्या कोल्हापूर विभागीय स्तरावरील फेरीचे आयोजन पटवर्धन हायस्कूल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
श्रीरंग हेरंब जोगळेकर याने एकल स्वरवाद्य (संवादिनी) प्रकारात तर ऋग्वेद केदार रेमणे याने एकल तालवाद्य (तबला) प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य श्री. गोसावी, पर्यवेक्षक श्री. केळकर, सांस्कृतिक विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

