(गणपतीपुळे / वैभव पवार)
जयगड बोरीवली मुंबई एस.टी.बस महाराष्ट्र दिनाच्या १ मे २०२५ पासून नियमित सुरू करण्यात येणार असून प्रवाशांनी या एस.टी.बसचा लाभ घ्यावा असे आवाहन खंडाळा येथील बस स्थानकाचे वाहतूक निरिक्षक श्री.चव्हाण यांनी केले आहे.
रत्नागिरी तालुक्यातील जयगड हे सुमारे १५/२० गावांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. लगतच गुहागर तालुका आहे. जयगड बाजारपेठ आहे, जिंदाल कंपनी आहे. चौगुले डॉकयार्ड कंपनी आहे. जयगड शिवकालीन किल्ला आहे. पर्यटक येथे सातत्याने येत असतात. दरम्यान, १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी जयगड बोरीवली मुंबई ही एस.टी. सायंकाळी ५ वा.सुटणार आहे.
जयगड येथून ही नव्याने ऐन हंगामात सुरू करण्यात येणार असल्याने जयगड, चाफेरी, खंडाळा, कळझोंडी, आगरनरळ, चाफे, जाकादेवी परिसरातील नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.