( संगमेश्वर / प्रतिनिधी )
चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत संगमेश्वर येथील पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने, त्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांचा आज व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
अजिंक्य अमोल शिंदे इ. ८वी आणि प्रथमेश सुजित शेट्ये इ. ९ वी या या पैसा फंड इंग्लिश स्कुलच्या दोन विद्यार्थ्यांनी, डेरवण येथे ९ सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक नवनाथ खोचरे यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने त्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या उज्वल यशाबद्दल व्यापारी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, सचिव धनंजय शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, ज्येष्ठ शिक्षक प्रकाश दळवी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. दोन्ही विद्यार्थ्यांना संस्था सचिव धनंजय शेट्ये आणि मुख्याध्यापक सचिन देव खामकर यांच्या हस्ते आज भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
(छाया : किशोर घुंगरड)

