(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा शाखा रत्नागिरी संस्कार विभाग आणि तालुका शाखा मंडणगड तसेच ग्रामशाखा आंबडवे यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, मु. आंबडवे, ता. मंडणगड येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ११.०० वाजता सुरु होईल आणि वर्षांवास प्रवचन मालिकेच्या अंतर्गत पार पडणार आहे. कार्यक्रमात जिल्हा, तालुका व शहरातील पदाधिकारी, बौद्धाचार्य, मा. श्रामणेर, शिक्षक/शिक्षिका, सैनिक, तसेच सर्व उपासक व उपासिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हा व तालुका शाखांतील पदाधिकारी आणि संस्कार विभागाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संपूर्ण तयारी केली आहे. अनंत सावंत (अध्यक्ष), एन. बी. कदम (सरचिटणीस), प्रदीप जाधव (कोषाध्यक्ष) यांच्यासह जिल्ह्यातील संस्कार विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन या सामाजिक कार्यक्रमाला यशस्वी करावे, असे संस्कार विभागाचे प्रमुख विजय जाधव यांनी आवाहन केले आहे.

