(रत्नागिरी / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातून काही दिवसांपूर्वी रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या पंधरा वर्षीय युवतीचा मृतदेह अखेर देवूड खाडीत सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मानसी मंगेश भायजे (वय १५, रा. धामापूर तर्फ संगमेश्वर) असे मृत तरुणीचे नाव आहे. मानसी ही ३१ ऑगस्ट रोजी आपल्या राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाली होती. या संदर्भात नातेवाईकांनी तातडीने संगमेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली होती. आज, सोमवारी सकाळी सुमारास १० वाजता देवूड खाडीच्या खाजणात तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे धामापूर गावात तसेच संगमेश्वर परिसरात शोककळा पसरली आहे. बेपत्ता झाल्यापासून मुलीच्या शोधासाठी धडपड करणाऱ्या कुटुंबावर दुर्दैवी प्रसंग ओढावल्याने गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

