(रत्नागिरी)
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ शनिवार, दि. २८ जून २०२५ रोजी माळनाका येथील मराठा हॉलमध्ये पार पडणार आहे.
यंदाच्या नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी श्री. प्रमोद कुलकर्णी, सचिवपदी श्री. रोहित वीरकर, तर खजिनदारपदी अॅड. स्वप्नील साळवी यांची निवड करण्यात आली आहे.
या सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून इंस्टॉलेशन ऑफिसर म्हणून श्री. रवी धोत्रे (माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, पुणे) उपस्थित राहणार आहेत. तसेच असिस्टंट गव्हर्नर श्री. श्रीकांत भुर्के, एरिया हेड श्री. निलेश मुळ्ये, आणि माजी अध्यक्ष श्री. रूपेश पेडणेकर यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे.
नवीन कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली रोटरी क्लबच्या उपक्रमांना नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास क्लबच्या सदस्यांकडून व्यक्त केला जात आहे.

