(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा होईल. त्यानंतर सकाळी आठ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करण्यात येईल.
सकाळी दहा वाजता पालखी प्रदक्षिणा काढण्यात येईल. सकाळी साडेदहा वाजता आरती आणि सकाळी अकरा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धाळूंनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी श्री. सहदेव पावसकर यांनी केले आहे.

