(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यामधील 94 ग्रामपंचायतींची सरपंच पदे आरक्षित करण्याची असून, या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत कार्यक्रम दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक ग्रामस्थांनी आरक्षण सोडतीच्या दिवशी व वेळी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी केले आहे.
मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 च्या नियम 2- अ(4) (6) नुसार सन 2025 ते 2030 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडील अधिसूचना आदेश क्र. / जिकार /कार्या-3 / ग्रापनि/ सरपंच आरक्षण / 2025 दिनांक 11 एप्रिल 2025 अन्वये रत्नागिरी तालुक्यामधील 94 ग्रामपंचायतींची सरपंच पदे आरक्षित करण्याची आहेत. या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत कार्यक्रम दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाटयगृह, मारुती मंदिर येथे घेण्यात येणार आहे. तरी इच्छु स्थांनी आरक्षण सोडतीच्या दिवशी व वेळी उपस्थित रहावे.