(रत्नागिरी)
तालुक्यातील चाँदसूर्या–खेडशी परिसरात एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवार 28 जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
दिलीप सखराम आंबेकर (42) आणि रंजन महादेव खापरे (56, दोघेही रा. डफळचोळवाडी, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. हे दोघे हातखंबा येथून रत्नागिरीच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जास्त मार लागल्याने दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद घेऊन संबंधित पोलिस अधिक तपास करत आहेत.

