(संगमेश्वर)
कोंडअसुर्डे (ता. सांगमेश्वर) येथील अवघ्या ७ वर्षीय सचिन विनीत खेडेकर याने आपल्या क्रीडा कौशल्याने संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढवला आहे. त्याला “मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार २०२५” या राज्यस्तरीय मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सांगमेश्वर पंचक्रोशी वैश्य समाजातर्फे सचिनचा त्याच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. समाजातील अनेक मान्यवर उपस्थित राहून त्यांनी सचिनचे अभिनंदन केले आणि त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
खेडेकर कुटुंबीयांनी समाजाकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

