(दापोली)
तालुक्यातील ग्रामसेवा संघ आगरवायंगणी आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात दहावी, बारावी, पदवीधर आणि विशेष प्रविण्य मिळवून नेत्र दीपक यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि मुंबई, ग्रामीण मंडळ संयुक्त सर्वसाधारण जाहीर सभा ग्रामसेवा संघ आगरवायंगणी मंडळाच्या वतीने नुकतीच जि. प. पू. प्रा. केंद्रशाळा आगरवायंगणी या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच आणि मंडळाचे कार्याध्यक्ष संतोष आंबेकर यांच्या अध्यक्षते खाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, शारदा माता आणि छत्रपती महाराजांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर गावातील ज्ञात-अज्ञात ज्यांचे दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन मुंबई मंडळाचे सचिव अजय शिगवण यांनी केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर ग्रामसेवा संघ आगरवायंगणी ग्रामीण अध्यक्ष प्रकाश आदावडे गुरुजी, मुंबई अध्यक्ष विलास आदावडे, तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम टेमकर, पोलीस पाटील विजय महाडीक, आगरवायंगणी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजन खांडेकर, ग्रामीण मंडळाचे खजिनदार आणि सोसायटी चेअरमन रमेश पवार, ग्रामीण मंडळ सचिव संदीप खांडेकर, मुंबई मंडळाचे सल्लागार मधुकर बेंडल, सतीश पवार, ग्रामीण मंडळ सल्लागार अशोक टेमकर, कृष्णा बिरवाडकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष दयानंद आदावडे गुरुजी, मुंबई मंडळ खजिनदार शंकर महाडीक, मुंबई मंडळ माजी अध्यक्ष महेश बेंडल, केंद्रशाळा आगरवायंगणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश गुरव, भैरी देवांचे मानकरी प्रकाश महाडीक, लक्ष्मण गुरव, प्रभाकर येलवे तसेच मुंबई,ग्रामीण कमिटी वरील सर्व उपाध्यक्ष, सहसचिव पदाधिकारी, सल्लागार, हिशोब तपासणीस, वाडी मंडळ अध्यक्ष, सचिव, सदस्य, विद्यार्थी बंधू-भगिनी, सर्व ग्रामस्थ बंधू-भगिनी उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम दहावी, बारावी, पंधरावी आणि विशेष प्रविण्य मिळविलेल्या गुणवंतांना सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच वेद विनोद आंबेकर, शर्वरी शांताराम टेमकर, अविनाश अशोक टेमकर या विद्यार्थांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यकमाची फोटोग्राफी वैभव आदावडे यांनी केली. विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम झाल्यानंतर जाहीर सभेला सुरुवात करण्यात आली. सदर सभेमध्ये सर्वप्रथम मागील सभेचे ठराव वृत्तांत वाचन करण्यात आले. यानंतर सभेच्या पत्रकाप्रमाणे विषय हाताळण्यात आले. काही विषयावर योग्य तो निर्णय घेण्यात आला. सर्व विषयांवर ग्रामस्थ बंधूनी आपली मते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आणि सभेचे अध्यक्ष संतोष आंबेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन करून सर्व विषयांवर योग्य निर्णय दिले. यानंतर कार्यक्रम आणि सभेचा समारोप ग्रामसेवा संघ आगरवायंगणी पोलीस पाटील विजय महाडीक यांनी अध्यक्ष्यांच्या वतीने सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपल्याचे जाहीर केले.

