(दापोली)
स्वत:ला मोठं समजत असू तर तरं आपलं वर्तनही तसेच अपेक्षित असतं, तसेच देशाला आणि जगाला जोडणारी संघटना म्हणजे अखिल भारतीय शिक्षक संघटना होय, असे अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ दापोलीच्या आयोजीत प्राथमिक शिक्षक मेळावा, सेवानिवृत्त शिक्षक सन्मान, आणि संघटना प्रवेश सोहळ्या दरम्यान दापोली येथील श्री मंगल कार्यालय येथे शिक्षक नेते दिलीप देवळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. अनेक वर्षे शिक्षक पतपेढी चे संचालक,अध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी केलेले देवळेकर यांनी आपल्या सहकार्यांसह रविवारी सदर संघटनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर यांचे अध्यक्षतेत संपन्न झालेल्या सोहळ्यात अखिलचे कोकण प्रांत अध्यक्ष, प्रमोद पाटील व राज्य संयुक्त चिटणीस कृष्णा चिकणे हे निरिक्षक म्हणून तसेच रायगड जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक बॅंकेचे अध्यक्ष सोपान चांदे, सेवानिवृत्त शिक्षक संघटना अध्यक्ष अमरचंद पाटील, शिक्षक नेते रमाकांत शिगवण, सतीश सावर्डेकर, आदि.मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी, सर्वांसोबत राहून चांगले काम करणेसाठी अखिलमध्ये प्रवेश केल्याचे सतीश सावर्डेकर यानी सांगितले; तर अखिल परिवाराने विशाल असा हार घालून प्रवेश, घट्ट आपुलकिने केला, त्याबद्दल आपण ज्या बॅनरखाली काम करत असतो,ते प्रामाणिकपणे कले पाहिजे,तसेच शिक्षक सेनेच्या सर्व शाखा अखिलमध्ये समाविष्ट केल्याचे सांगत देवळेकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये अखिलच्या शाखा असतील, यासाठी देवळेकरला कोणते पद असावे असे नाही.
देशाला आणि जगाला जोडणारी संघटना म्हणजे अखिल भारतीय शिक्षक संघटना होय, जिल्ह्यात संघटनेचे भरीव काम करणेसाठी आपण सदर संघटनेत आल्याचे मत व्यक्त करीत जूनी पेन्शनसाठी केंद्रात झगडावे लागते,आणि यासाठी फक्त हीच संघटना करु शकते. जिल्ह्यात अग्रेसर अखिल संघटना असेल असे अभिवचन देवळेकर यांनी दिले.
विश्वास संपादन झाल्यानंतरच देवळेकर यांनी नैतिकता, आपलं काम, आणि आपलं प्रेम पाहूनच इथं प्रवेश केला असून, विचारांचा आणि कार्याचा संगम झाल्याचे ,शिक्षक नेते रमाकांत शिगवण यांनी सांगितले. तसेच जुनी पेन्शन लागू करणेसाठी कटिबद्ध राहुया असेही शिगवण यांनी सांगितले. तर सरचिटणीस, संतोष देवघरकर-अखील ही माझी ओळख असे प्रत्येक शिक्षकाला वाटते कारण विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरणारी असे शिक्षक या संघटनेत कार्यरत असल्यामुळेच या संघटनेची ओळख माझी संघटना अशी होते. तर कोकण अध्यक्ष, प्रमोद पाटील यांनी अखिल ही एकसंघ, अभेद्य अशी असलेली संघटना असून आपण सर्वानी अभ्येद्यच रहावे असे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सतीश सावर्डेकर आणि कृष्णा चिकणे यांनीही मनोगते व्यक्त केली. दापोली शाखेच्या उत्कृष्ठ नियोजनाबाबत तालुकाध्यक्षांसह सर्वांना चिखले यांनी धन्यवाद दिले. दरम्यान दापोली तालुक्यातील अनेक नवनियुक्त शिक्षकांचाही अखिल शिक्षक संघात जाहीर प्रवेश झाला. तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सेवापूर्तिकडे वाटचाल सुरु असतांना, आपल्या अखिल शिक्षक संघाची मूळे जिल्हाभर घट्ट रूजावी, हे अनेक दिवसाचे आपले स्वप्न साकार होत असून,आपण निवृत्त होण्यापूर्वी अखिलच्या जिल्ह्यात शाखा सुरु व्हाव्यात असा मनोदय होता तो सेवापूर्तिच्या आधी ९ दिवस तो आज पूर्ण झाला, असे सोहळ्याचे अध्यक्ष प्रवीण काटकर यांनी मत व्यक्त केले.
यावेळी सेवा निवृत्त शिक्षकांसह प्रवेशकर्ते शिक्षक यांचा सन्मान करणेत आला. स्वागत व सुत्रसंचलन वैभव बोरकर यांनी तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विजय फंड यांनी केले.