(दापोली)
तालुक्यातील करजगाव-बुरुमवाडी येथे विहिरीत पडून सहदेव बाबाजी चांदवडे (वय ७१) यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार, दुपारी सुमारे ३.४० वाजता घडली. याबाबत त्यांचे चिरंजीव संदेश सहदेव चांदवडे (मूळ गाव करजगाव-बुरुमवाडी, सध्या रा. मोरेगाव, नालासोपारा, मुंबई) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश चांदवडे शनिवारच्या दिवशी गावातील पूजेचे विसर्जन करण्यासाठी तामसतीर्थ येथे गेले होते. विसर्जन आटोपून घरी परतल्यानंतर त्यांनी वडिलांचा शोध घेतला असता, ते घरासमोरील विहिरीत पडलेले दिसून आले. त्यांनी तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीने वडिलांना विहिरीतून बाहेर काढून दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.