(साखरपा / भरत माने)
कोंडगाव बाजारपेठ येथे वास्तव्यास असणारे एसटी मध्ये कार्यरत असणारे चालक संतोष कृष्णा किर यांना विना अपघात २५ वर्षे सेवेबद्दल पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सध्या ते देवरुख डेपो येथे कार्यरत आहेत. या पुरस्कार वितरण समारंभावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषद मुख्यधिकारी, एस टी विभागीय नियंत्रक आदी मान्यवर उपस्थित होते. एसटी मध्ये संतोष किर हे मागील २७ वर्षे कार्यरत आहे.
१९९९ मध्ये लांजा डेपोतून सेवेला प्रारंभ केला होता. ड्राईव्हीग क्षेत्रातील त्यांचे भाऊ कै. बापुदादा किर व एसटीतील संजय सुर्वे व श्री. भोसले हे मार्गदर्शक असल्याचे सांगितले. आतापर्यंत त्यांनी लांजा, चिपळूण, खेड, देवरुख या ठिकाणी सेवा दिली आहे. आतापर्यंत आपला मित्रपरिवार, नंदू जुवेकर, भाऊ डंबे व आजपर्यंत काम केलेल्या सर्व डेपोतील मित्रांचे आपल्याला उत्तम सहकार्य मिळाले असल्याचे सांगितले. त्याचरोबर आई, पत्नी व मुलांची व सर्व कुटुंबीयांची आपल्याला खंबीर साथ लाभल्याने त्यांनी सांगितले.
एसटी मध्ये सेवा देताना आपल्याला अनेक सुखद अनुभव आल्याचे म्हणाले, यामध्ये कार्तिक वारीला पंढरपूर यात्रा, देवदर्शन यात्रा, शिमगा व गणपती सणाला चाकरमान्याना गावात आणणे, कोरोना काळात मुंबई येथील बेस्ट सेवा, महाकारगो सेवा व शैक्षणिक सहली आपण चालक म्हणून उत्तम पार पाडल्या.
अजून त्यांच्या सेवेतील एक वर्ष बाकी आहे. नवीन पिढीतील चालकांना संदेश देताना ते म्हणाले की, एसटी प्रवास करणारा प्रत्येकजण आपल्या कुटुंबातील सदस्य आहे.त्यामुळे त्यांना आपुलकीची सेवा देणे महत्वाचे आहे.तसेच वाहन चालवताना योग्य वेग मर्यादा, योग्यवेळी गिअर बदलणे व रस्त्यावरील नियमांचे पालन केल्यास तुम्ही एक यशस्वी चालक होऊ शकता हे सांगायला ते विसरले नाहीत.
आपली राहिलेली एक वर्षीय सेवा आपण प्रामाणिकपणे व नेमाने पार पाडणार असल्याचे सांगितले. त्यांनी आपले आई वडील, पत्नी, मुले, कोंडगाव बाजार पेठेतील मित्रपरिवार, संपूर्ण किर परिवार, सोबत काम करणारे आजी माजी कर्मचारी, अधिकारी यांच्याविषयीं आभार व्यक्त केले.

