(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे भाद्रपदी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. या उत्सवाच्या द्वितीय दिनी सोमवारी स्वयंभू श्री गणरायाच्या चरणी सहस्र मोदक समर्पण विधी मोठ्या भक्तिभावाने पार पडला.
यावेळी संस्थान श्री देव गणपतीपुळे चे विश्वस्त विनायक तुकाराम राऊत यांनी पत्नीसमवेत मनोभावे पूजा आणि सहस्रनाम समर्पण केले. कार्यक्रमाला मुख्य पुजारी प्रभाकर घनवटकर, निलेश घनवटकर, अमित घनवटकर, चैतन्य घनवटकर तसेच विश्वस्त विद्याधर उर्फ उदय शेंडे यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.

भाद्रपदी उत्सवाच्या निमित्ताने संस्थानमार्फत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून स्थानिक ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने सहभाग घेत आहेत. उत्सव सुरळीत आणि भक्तीमय वातावरणात पार पाडण्यासाठी देवस्थानची पंच कमिटी, मुख्य पुजारी मंडळी व कर्मचारी विशेष मेहनत घेत आहेत.

