(चिपळूण)
चिपळूण येथे शिक्षक पतपेढी सभागृहात आज संपन्न झालेल्या रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात दापोलीचे शिक्षक नेते जीवन सुर्वे यांची राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय नेते संभाजीराव थोरात उर्फ तात्या यांनी सभागृहात या नियुक्तीची घोषणा केली.
संघटनात्मक क्षेत्रात गेले 30 वर्षाहून अधिक काळ जीवन सुर्वे यांनी केलेल्या सेवेची पोहोच पावती म्हणून हे अत्यंत मानाचे व प्रतिष्ठेचे पद आपण त्यांना देत असल्याचे तात्यांनी सांगितले. राष्ट्रीय प्रवक्तेपदी झालेली नियुक्ती आपल्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान असून दापोलीतील सर्व प्राथमिक शिक्षक बंधू भगिनी तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षक संघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी राज्य पदाधिकारी यांनी आजवर आपणास जी समर्थ साथ व समर्थन दिले त्यामुळे आपण या पदापर्यंत पोहोचू शकलो अशी प्रतिक्रिया सुर्वे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केली.
राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम तसेच पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत यांनी जीवन सुर्वे यांचे विशेष अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. या पदाच्या माध्यमातून आपण तालुका जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असेदेखील त्यांनी सांगितले या पदावर आपली नियुक्त केल्याबद्दल त्यांनी राष्ट्रीय नेते संभाजीराव थोरात उर्फ तात्या तसेच राष्ट्रीय व राज्य कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.