(मंडणगड)
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मंदिर संस्कृती रक्षणाच्या उद्देशाने मंडणगड तालुका मंदिर अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. या अधिवेशनाला मंदिर विश्वस्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या धर्मकार्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात दोन आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील दुर्गवाडी येथील श्रीकृष्ण मंदिरात आढावा बैठक संपन्न झाली.
या आढावा बैठकीत विश्वस्तानी देवराहाटी, वस्त्र संहिता मंदिरात लागू करणे, धर्मशिक्षण, सामूहिक आरती या विषयांबाबत चर्चा केली. हे सर्व मुद्दे मंदिर विश्वस्त आणि ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी पंचक्रोशीतील मंदिरांची एकत्रित बैठक लावण्याचं ठरले. आणि त्याचे दायित्व मंदिर विश्वस्तांनी स्वीकारले. या चर्चेत उपस्थित मंदिर विश्वस्तानी उत्स्फूर्त सहभाग घेतला. बैठकीत मंडणगड,पाट, लाटवण,केळवत,तुळशी,पचारल येथील विश्वस्त,धर्मप्रेमी उपस्थित होते. बैठकीनंतर देवरहाटी संदर्भात आणि देवस्थानच्या जमिनीबाबत अँटी लँड ग्रॅबिंग (प्रतिबंध ) कायदा आणावा या मागणीचे निवेदन शासनाला मंडणगड तहसीलदार यांचेकडे देण्यात आले.
त्याचप्राणे ग्रामीण भागासाठी सायंकाळी ५ वाजता देव्हारे येथील पूर्व वाडी समाज मंदिरात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला देव्हारे चे माजी सरपंच श्री सीताराम बैकर,मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री सुरेश भोवने, श्री भारत म्हाब्दी, बाणकोट येथील श्री रवींद्र वनगुले, श्री सुनील जाधव,महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संयोजक श्री रमेश कडू, श्री सुरेश रेवाळे, हिंदू जनजागृती समितीचे श्री परेश गुजराथी यांचेसह १७ विश्वस्त, धर्मप्रेमी उपस्थित होते.
या बैठकीत देवरहाटी ,हिंदूंचे होत असलेले धर्मांतरण, हिंदूंच्या मंदिरांच्या जमिनीमध्ये अन्य धर्मियांचे होत असलेले आक्रमण याबाबत विस्तृत चर्चा झाली. यातुन हिंदूंमध्ये जागृती करणे आणि हिंदूंच्या प्रभावी संघटनची आवश्यकता सगळ्यांच्या लक्षात आली.चर्चेत उपस्थितांनीउस्फूर्त सहभाग घेतला. चर्चेनंतर तालुक्यातील ५० गावे प्रसारासाठी निश्चित करुन ६ पंचक्रोशीत विभागणी करून त्याचे दायित्व उपस्थित विश्वस्तानी घेतले.

