(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी ते पावस जाणाऱ्या रस्त्यावर गोळपधार परिसरात दिनांक २१ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास गंभीर ट्रक अपघात झाला. अपघातात संशयित आरोपी व चालक सय्यद अन्सार पाशा (वय ५०, चित्रदुर्ग, कर्नाटक) आपल्या ताब्यातील अशोक लेलॅन्ड ट्रक (के.ए.-१६/ए.ए.१४११) गोळपहून रानी बेन्नूरकडे नेत असताना अपघात झाला.
फिर्यादी महेश अरविंद कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाने रस्त्याची विशेष परिस्थिती लक्षात न घेता ट्रक अविचाराने चालविला. त्यातून स्वतःला दुखापत झाली तसेच ट्रक आणि त्यातील मालाचेही नुकसान झाले आहे. अपघातात जखमी चालक सय्यद अन्सार पाशा यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी गुन्हा क्र. ६०/२०२५ नोंदवण्यात आला असून भारतीय दंड संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

