(संगमेश्वर)
तालुक्यातील देवरुख येथील केशवसृष्टी गावात घरफोडीचा धक्कादायक प्रयत्न उघडकीस आला आहे. मंगळवारी रात्री २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी १०.३० वाजताच्या सुमारास शामराव रामचंद्र सप्रे यांच्या घरात संशयित आरोपींनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी संजय प्रभाकर इंदुलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी घरातील बंद कौले काढून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा, घरातील लोखंडी कटावणी आणि कदळ उचकल्याचा सांगण्यात आले आहे. तसेच, स्वतः आणलेल्या स्क्रू ड्रायव्हरचा उपयोग करून चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी पकडले गेले.
या प्रकरणी पोलीसांनी रविराज वसंत बिर्जे (वय ३२, कोसंब रामवाडी) व मंगेश काशीनाथ पेंढारी (वय ४२, देवरुख कांगणेवाडी) यांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींना २२ ऑगस्ट रोजी सकाळी ३.५५ वाजता ताब्यात घेतले, अटक केलेल्या संशयित आरोपींवर भारतीय दंड संहिता २०२३ चे कलम ३३१(४), ३०५ (अ), ६२, ३(५) प्रमाणे कारवाई सुरू आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

