(लांजा)
उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत आयोजित शिवसेना महिला आघाडी लांजा तालुका श्रावणमास मंगळागौर स्पर्धा गणेश मंगल कार्यालय (आग्रे हॉल) लांजा येथे नुकत्याच संपन्न झाल्या. यामध्ये सत्यविनायक गार्डन कणावजे वाडी लांजा यांनी सादर केलेल्या पारंपारिक मंगळागौर सोबत आधुनिक मंगळागौर आणि सामाजिक जनजागृती कार्यक्रमाला १०,०००/- रुपये व चषक असलेले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
सत्यविनायक गार्डन मधील महिला सदस्यांनी सहभाग नोंदवून सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

