( देवळे / प्रकाश चाळके )
संगमेश्वर तालुक्यातील मिनाताई ठाकरे हायस्कुल साडवली या प्रशालेत संस्थापकीय अध्यक्ष श्री रविंद्र माने यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये कला शिक्षक प्रदीप कृष्णा शिवगण यांच्या मार्गदर्शनाने दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी शिवने या प्रशालेतील विविध गटात सहभाग घेतला होता.
चित्रकलेच्या स्पर्धेचा विषय होता आठवडा बाजार असा होता. या स्पर्धेत इयत्ता ५ वी ते ६ वी प्राथमिक स्तरामधून कुमारी श्रेया यशवंत धाडवे, (द्वितिय क्रमांक) कुमारी अंतरा योगेश सप्रे (तृतीय क्रमांक) तर ७ वी ते८ वी उच्च प्राथमिक गटातून कुमार मानस विलास घडशी (द्वितीय) कुमार आयुष अरविंद घडशी (तृतीय) कुमार श्लोक शशिकांत घडशी (पाचवा) तसेच इयत्ता ९ वी ते १० वी माध्यमिक गटातून कुमार ओंकार सखाराम रामाणे (द्वितीय) व कुमार सार्थक रामाणे (पाचवा) क्रमांक पटकाविला आहे.
दरवर्षी प्रमाणे या शैक्षणिक वर्षातही कुमार ओंकार रामाणे यांनी काढलेले आठवडा बाजार हे चित्र लक्षवेधी ठरून उपस्थित मान्यवर व परीक्षकांची या चित्राने मने जिंकली. मार्गदर्शक शिक्षक श्री प्रदीप शिवगण व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष राजाराम गर्दै सर, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद बाईत यांचेसह सर्व संचालक तसेच प्रशालेचे प्राचार्य प्रकाश विरकर सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

