( संगमेश्वर / प्रतिनिधी )
कै.मीनाताई ठाकरे हायस्कूल येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षे मैदानी शालेय क्रीडा स्पर्धेत पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरच्या दहा खेळाडूनी विविध स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवणारे विद्यार्थी पुढील प्रमाणे मानव कैलास कुडतडकर इयत्ता ८ वी २०० मी.धावणे तृतीय क्रमांक, पार्थ महेश देसाई इयत्ता १२ वी ८०० मी धावणे द्वितीय क्रमांक, सृष्टी वसंत शिंदे इयत्ता १२ वी २०० मी धावणे प्रथम क्रमांक, सृष्टी वसंत शिंदे इयत्ता १२ वी ४०० मी धावणे द्वितीय क्रमांक, रोशनी निलेश कळंबटे इयत्ता १२ वी उंच उडी तृतीय क्रमांक, आदिती मंगेश साटले ११ वी थाळी फेक प्रथम क्रमांक, श्रृती शांताराम बारगुडे ११ वी गोळा फेक प्रथम क्रमांक, अनुष्का मंगेश भुवड ११ वी ४०० मी धावणे तृतीय क्रमांक ओंकार श्रीपत घडशी ११ वी ४०० मी हर्डल्स द्वितीय क्रमांक, ओंकार श्रीपत घडशी ११ वी ८०० मी धावणे तृतीय क्रमांक.
सर्व खेळाडंचे तसेच मार्गदर्शक शिक्षक नवनाथ खोचरे राकेश लोध यांचे या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिन देव खामकर पर्यवेक्षक प्रकाश दळवी आदींनी अभिनंदन केले आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंची निवड डेरवण येथे होणाऱ्या जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.

