(देवरूख)
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, तेर्ये गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते श्री. शांताराम भुरवणे यांचे कोल्हापूर येथे आकस्मिक निधन झाले.
शांताराम भुरवणे हे संयमी, विवेकी, कार्यतत्पर आणि समाजकार्याला वाहुन घेतलेले असे व्यक्तिमत्त्व होते. संस्थेच्या कार्यात त्यांनी अमूल्य असे योगदान दिले. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहणारे आहे. याबरोबरच ते अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीत अग्रेसर राहुन कार्य करीत होते. सामाजिक बांधलकी जोपासत त्यांचे काम सतत सुरुच होते.
बँक ऑफ इंडिया मधुन ते अधिकारी पदावरुन काही वर्षांपुर्वी निवृत्त झाले होते. श्री. भुरवणेंच्या इच्छेनुसार, त्यांच्या कुटुंबीयांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला. शांताराम भुरवणे यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच बुरंबी पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

