(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
संगमेश्वर नायरी कातूर्डी मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असुन गेल्या पंधरा दिवसात कातूर्डी एसटी चा तिसरा अपघात असल्याने एसटी चालकांच्या बेदरकारपणाचा कहर झाल्याचे बोलले जात आहे.
आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास कातूर्डी हुन संगमेश्वर कडे येणारी परिवहन मंडळाची गाडी कोंड उमरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुढे आली असता समोरून सुसाट आलेल्या रिक्षाला साईड देताना चालकाने प्रसंगवधान दखवल्याने मोठा अपघात टाळला असला तरी गाडी रोड साईडला कलंडली, या वेळी गाडीत पन्नासहुन अधिक प्रवासी होते, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
पंधरा दिवसा पुर्वी याच परिसरात कातूर्डी गाडीने विद्युत पोलला धडक दिली होती. आठ दिवसा पुर्वी संगमेश्वर हुन कातूर्डी कडे जाणाऱ्या एसटिला कारभाटले नजीक समोरून येणाऱ्या महिंद्रा टेम्पोने धडक दिली होती, त्यामध्ये टेम्पो चालक गम्भीर जखमी झाला होता, तर दोनही वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.
शास्त्री पूल ते नायरी, निवळी, कातूर्डी हा मार्ग अरुंद असुन वळना वळणाचा असुन समोरून येणारे वाहनाला अंदाज येत नाही. आणि रस्ता मोकळा दिसल्याने चालक बिनधास्त पणे सुसाट वाहन हाकत असतात. आणि अपघाताला निमंत्रण देत आहेत.
वरील दोनही अपघात समोरील चालकांच्या हलगर्जी पणा मुळे झाले असले तरी अनेक वेळेला पर जिल्ह्यातील आलेले एसटी चालक देखलील या मार्गावर सुसाट एसटी चालवत असल्याचे प्रवासी व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. देवरुख आगार प्रमुखांनी या चालकांना सूचना द्याव्यात अशी मागणी होत आहे. अनेक वेळा उमरे मार्गावर सुसाट एसटी चालकांना कळंबस्ते तेले वाडी येथील ग्रामस्थानी समज दिल्याचे समजते. तरी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून लोकांच्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या चालकांना योग्यती समज द्यावी अशी मागणी होत आहे.

