(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील शाळा चाफवली नं.१ ता. संगमेश्वर येथे सर्व शिक्षण अभियान व संगमेश्वर पंचायत समितीच्या वतीने समन्वयक श्री. समीर काब्दुलेसर यांनी पॅट परीक्षा व वार्षिक परीक्षा या कालावधीत तपासणी व मार्गदर्शन याकरिता नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी शालेय परीक्षा नियोजन, परीक्षा व्यवस्था, पेपर नियोजन, पर्यवेक्षक नियोजन, तोंडी परीक्षा व परीक्षा विषयक सूचनांचा आढावा घेऊन शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व परीक्षा दस्ताऐवजांची तपासणी करून सूचना दिल्या व समाधान व्यक्त केले.
त्याचप्रमाणे नुकत्याच इस्त्रो दौऱ्यासाठी बेंगलोर येथे जाऊन आलेल्या शाळा चाफवली नं.१ ची विद्यार्थिनी कुमारी समीक्षा सुरेश बोडेकर हिचे त्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच पुढील नासा दौऱ्यासाठी ती अमेरिका येथे रवाना होणार असल्यामुळे तिला या मोहिमेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तिचे या यशाबद्दल विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी शाळेच्या वतीने श्री समीर काब्दुले यांचे पुष्पगुच्छ देऊन व पुस्तक देऊन हार्दिक स्वागत व आभार व्यक्त करण्यात आले. श्री काब्दुले यांनी मुख्याध्यापक श्री.मोघे, शिक्षक वृंद सौ.कदम मॅडम, श्रीम.सोलापूरे मॅडम व श्रीम. मगदूम मॅडम यांचे सहकार्याबद्दल व शाळेच्या उत्तुंग यशाबद्दल कौतुक केले.