( संगमेश्वर / प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या शिक्षकांची १२ वर्षे सेवा पूर्ण झाली आहे अशा शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे,व ज्या शिक्षकांची सेवेला २४ वर्षे पूर्ण झाली आहेत व शासकीय नियमाने लाभार्थी आहेत अशांची निवड श्रेणीचे प्रशिक्षण रत्नागिरी येथे सुरू झाले आहे. यामध्ये वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचे प्रशिक्षण २ जून ते १२ जून या कालावधीत होत आहे. रत्नागिरी जिल्हा शिक्षण,बीप्रशिक्षण संस्थेतर्फे (डायट)तर्फे हे प्रशिक्षण सुरू आहे. सर्व राज्यभरात एकाच वेळी हे प्रशिक्षण सुरू आहे.
डाएट चे प्राचार्य प्राचार्य सुशील शिवलकर यांच्या मार्गदर्शनाखालींचे प्रशिक्षण सुरू आहे.प्रशिक्षणाचे नियोजन, राहुल बर्वे, राजेंद्र लठ्ठे, फाटक हायस्कुल चे मुख्याध्यापक राजन कीर, अश्विनी काणे( साधनव्यक्ती) पहात आहेत तर सुलभक म्हणून मोहन बापट, विष्णू पवार, अनंत जाधव, श्री जोपळे, प्रभात कोकजे, मानसी गानू, सागर पोकळे, दिगंबर घवळी, वर्षा घाग, विभा बाणे, सुधीर शिंदे आदी काम पहत आहेत
हे प्रशिक्षण प्राथमिक, माध्यमिक,उच्चमध्यमिक,व कला क्रीडा अशा विविध गटात सुरू आहे. पहिल्या दिवशी सकाळी डाएट चे प्राचार्य सुशील शिवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षणाचा शुभारंभ झाला.यावेळी प्राचार्य सुशील शिवलकर यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.
वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रशिक्षण फाटक हायस्कुल तर निवड वेतन श्रेणीचे मार्गदर्शन पटवर्धन हायस्कुल येथे सुरू झाले आहे.दरम्यान हे प्रशिक्षण २ ते १२ जून पर्यंत सकाळी ९.१५ ते सायंकाळी ५.३० पर्यंत असणार आहे.७ रोजी ईदी ची सुट्टी असणार असल्याचे डाएट कडून सांगण्यात आले.
फोटो : वरिष्ठ वेतनश्रेणी च्या प्रशिक्षणाला आलेल्या शिक्षकांना मार्गदर्शन करताना प्राचार्य सुशील शिवलकर,राहुल बर्वे आदी तर दुसऱ्या छायाचित्रात प्रशिक्षणार्थी